![](https://i.ytimg.com/vi/Z_kw27f5dmM/hqdefault.jpg)
India Attack Live पाकिस्तानवर हवाई सर्जिकल स्ट्राईक
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
हिंदुस्थानने दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले आहे. पाकिस्तानी हवाई हद्दीत घुसून हिंदुस्थानी लढाऊ विमानांनी 1000 किलोपर्यंतच्या विस्फोटकांनी हल्ला केला. पहाटे साडेतीन वाजता 12 मिराज विमानांनी बालाकोट भागात हे हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उध्वस्त झाल्याचं वृत्त आहे. मिराज2000 या बनावटीच्या विमानांनी हा हवाई हल्ला केला आहे. हिंदुस्थानी हवाई दलाने या हल्ल्याबाबत अधिकृत माहिती दिली नाहीये, मात्र ANI या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Air Strike LIVE UPDATE:
पाकिस्तान विरोधात कारवाई केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याचे ट्वीट, हवाई दलाच्या जवानांना केले सॅल्यूट
पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह माहिती देणार- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या हवाई हल्ल्याची माहिती दिली
हिंदुस्थानने आज पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ला केला आहे.मिराज 2000' जातीच्या लढाऊ विमानांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाहा फोटो गॅलरी...
![](https://assets-news-bcdn-ll.dailyhunt.in/cmd/resize/670x660_60/fetchdata13/images/ab/92/bb/ab92bb8a617be56d42aae80aa2c9660c.jpg)
![](https://assets-news-bcdn-ll.dailyhunt.in/cmd/resize/670x660_60/fetchdata13/images/4c/35/66/4c356605f2d6d9ce4d2ece0a70eb2c0b.jpg)
![](https://assets-news-bcdn-ll.dailyhunt.in/cmd/resize/670x660_60/fetchdata13/images/39/b9/46/39b946358b741622417d3d560be77e3c.jpg)
- पाकिस्तानी दहशतवादा विरोधात पहिल्यांदाच हवाई दलाचा वापर केला आहे- ब्रिगेडीअर हेमंत महाजन
- हवाई दल, सैन्याचे कौतुक आहे- ब्रिगेडीअर हेमंत महाजन
- पाकिस्तान हवाई हल्ला झाला हे मान्य करायला तयार नाही-ब्रिगेडीअर हेमंत महाजन
पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानची विमाने पाकिस्तानात घुसल्याचे मान्य केले आहे. या विमानांवर आम्ही कारवाई केल्याची थाप मारूनही ते मोकळे झाले आहे. या विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये काहीच नुकसान झालं नसल्याचीही थापा मारल्या आहेत.